शिरूर : अचानक लागलेल्या आगीत घर भस्मसात

शिरूर : अचानक लागलेल्या आगीत घर भस्मसात
Published on
Updated on

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील हरिभाऊ मोहनराव फराटे यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर असे की, मांडवगण-तांदळी रस्त्यावर हरीभाऊ फराटे यांचे घर आहे. गुरुवारी (दि. २०) अचानक त्यांच्या घराला आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. ही माहिती तात्काळ फराटे यांना कळविण्यात आली. आग लागली त्यावेळी कोणीही घरी नव्हते.

दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या तसेच शेजारील ग्रामस्थांनी तत्काळ आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे स्वरूप पाहता आग आटोक्यात आली नाही. काही क्षणात आगीने तीव्र रूप धारण केले. या आगीत घरातील कौटुंबिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, संसारोपयोगी साहित्य, भांडी, घरातील रोख रक्कम असा ऐवज पूर्णपणे खाक झाला.

हरीभाऊ फराटे हे गावात चहा विक्रीचा व्यवसाय करतात, तर कुटुंबातील इतर सदस्य मोलमजुरी करतात. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून गेल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. मुलांची शैक्षणिक कागदपत्रे जळून गेली आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news