वाल्हेकरवाडीतील दवाखान्याची इमारत धोकादायक

The hospital building in Walhekarwadi is dangerous
The hospital building in Walhekarwadi is dangerous
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाल्हेकरवाडी येथील पालिका दवाखान्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या पाच वर्षांपूर्वी झाले आहे. त्यानुसार ही इमारत धोकादायक झाली असून, येथील रुग्णालय तसेच व्यायामशाळा अन्यत्र स्थलांतरीत करण्याची गरज आहे.

वाल्हेकरवाडीतील दवाखान्याच्या इमारतीचे सन 2016 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होेते. त्यातील अहवालानुसार ही इमारत वापरण्यास धोकादायक ठरू शकते, इमारत कोसळून दुर्घटना होण्यापूर्वी, जुने बांधकाम पाडून रुग्णालय व व्यायामशाळा तत्काळ स्थलांरित करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने केली जात आहे.

चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमधील महापालिकेच्या या दवाखान्यात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. तर पहाटे आणि सायंकाळी येथील व्यायामशाळेत युवकांची गर्दी असते.

मात्र, स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार या दवाखान्याच्या इमारतीसाठी वापरलेल्या सिमेंट काँक्रीटची क्षमता पूर्णपणे संपलेली आहे. पाणी गळतीमुळे सळया व तारा गंजल्या आहेत. भिंती व स्लॅबला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.

त्यासोबतच सज्जांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहातील ड्रेनेज पाईप तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहात सर्वत्र पाण्याची गळती होत आहे.

इमारतीचे प्लास्टर पूर्णपणे खराब झाले आहे. इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी गळत आहे. तसेच भिंतींना भेगा पडल्याने पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरलेले आहे. अशा धोकादायक इमारतीमध्ये सध्या दवाखाना सुरू आहे.

इमारतीच्या या दुरवस्थेबाबात दवाखाना व्यवस्थापनाने सन 2016 पासून अनेक वेळा 'अ' व 'ब' क्षेत्रिय कार्यालय, तसेच पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी तसेच व्यवस्थापनासोबत पत्रव्यवहार केला आहे;

परंतु क्षेत्रीय कार्यालय आणि संबंधित विभागाकडून या दुरवस्थेबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याचे दवाखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

'ब' क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या वतीने या इमारतीची वरवर डागडुजी करून रंगरंगोटी केली आहे.या संदर्भात माहिती घेण्यासाठी संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होवू शकला नाही.

सन 2016 च्या ऑडीटनुसार ही इमारत धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे; मात्र तरी देखील महापालिका याकडे डोळेझाक करीत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण. त्यामुळे येथील दवाखाना व व्यायामशाळेचे स्थलांतर करावे, याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
– नितिन यादव,अध्यक्ष जागृत नागरिक महासंघ,पिंपरी-चिंचवड.

https://youtu.be/54feKZ9Pdlc

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news