PM Modi Pune Visit: पुण्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी काम करणार: पंतप्रधान मोदी

Pune News: 'पुण्याच्या कनेक्टिव्हिटीसाठीही सरकार काम करते आहे'
PM Modi Pune Visit
पुण्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी काम करणार: मोदीPudhari
Published on
Updated on

PM Modi News: देशात पुढच्या अडीच वर्षांत ज्या कंपन्या येत आहेत, त्यांच्या यादीत महाराष्ट्र सर्वांत वर असून, त्यातही पुणे परिसरास गुंतवणुकीचा मोठा हिस्सा मिळत आहे. मेट्रो, रिंगरोड, पालखी मार्ग आदीद्वारे पुण्याच्या कनेक्टिव्हिटीसाठीही सरकार काम करते आहे. पुणेकरांच्या आकांक्षा हाच मला आदेश आहे.

आपली स्वप्ने माझ्यासाठी दिवस-रात्र काम करण्याची प्रेरणा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.पुणे व सातारा जिल्ह्यांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit: काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा; पंतप्रधान मोदी यांचा घणाघात

महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महायुतीने सुरू केलेले प्रकल्प अडविण्याचेच काम केले. मात्र, महायुतीचे नवे सरकार पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठीच काम करेल, असे सांगून ते म्हणाले की, आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली तेव्हा उद्यमशील युवकांना तिचा लाभ झाला. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. ऑटोमोबाईल क्षेत्र तर पुण्याचे हबच आहे.

आपल्या इच्छा हा माझ्यासाठी आदेश असून, तुमची स्वप्ने ही माझ्यासाठी दिवस-रात्र काम करण्याची प्रेरणा आहे. तुमचे जीवन सोपे-सुलभ करणे ही महायुतीची प्राथमिकता आहे; म्हणूनच मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे. स्वारगेट-कात्रज मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

इंट्रासिटी व इंटरसिटी या दोन्ही आघाड्यांवर काम सुरू असून, त्याअंतर्गत पूर्व व पश्चिम बाह्यवळण मार्गासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खोपोली-खंडाळा मिसिंग लिंक प्रकल्पावरही साडेसहा हजार कोटी खर्च होणार आहे. पुणे हे 21 व्या शतकातील सर्वोत्तम दळणवळण सुविधा असलेले शहर बनविण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.

PM Modi Pune Visit
साहेबांच्या प्रेमामुळे लोकांनी अजितदादांना सहन केले : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

वारकर्‍यांसाठी समर्पित सेवा

कार्तिकी एकादशी असल्याची आठवण करून देत, पंढरपूर यात्रा पालखी मार्गाच्या विस्तार व विकासासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असून, वारकर्‍यांसाठी ही आमची समर्पित सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या जेवणात कोथिंबीरवडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संध्याकाळच्या जेवणात महाराष्ट्रीयन कोथिंबीरवडीचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या जेवणाची लिस्ट पीएमओकडून एअर इंडियाच्या किचनला प्राप्त झाली आहे. यामध्ये कोथिंरबीरवडीसह बाकरवडी आणि अन्य गुजराथी भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी पुण्यात सभा उरकून दिल्लीला रवाना झाले. या वेळी त्यांच्या जेवणाची व्यवस्था विमानामध्ये करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news