दापोडी : मुळानगर झोपडपट्टीवासीयांची धाकधूक वाढली

दापोडी : मुळानगर झोपडपट्टीवासीयांची धाकधूक वाढली
Published on
Updated on

दापोडी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना व मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सांगवीतील मधुबन सोसायटी, मुळानगर झोपडपट्टी, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, मुळानगर नदीकिनारा परिसरातील घरांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना

सांगवी येथील मुळा नदीपात्राशेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीवासीयांची धाकधूक वाढली आहे. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभाग मुळा व पवना नदीपात्रातील पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत. सांगवी पोलिसांनी त्यांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांची गस्त वाढली
मात्र, अद्यापही नागरिकांना येथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले नाही. पोलिसांनीही गस्त वाढवली आहे. तसेच, नागरिकांना आपली घरे खाली करण्याच्या सूचना पोलिसांनी झोपडपट्टीवासीयांना दिल्या आहेत.

मुळा नदीपात्रात वाढ
दरवर्षी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की, सांगवीतील मुळानगर झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जाते. पुराचे पाणी ओसरल्यावर पुन्हा नागरिक आपापलं झोपडीवजा घर दुरुस्त करून राहतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते. यंदाही मुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने मुळा नदीपात्रातील पाणी वाढले आहे.

राडारोड्यामुळे नदीपात्र झाले अरुंद
पावसामुळे झालेल्या दलदलीमुळे मुळानगर झोपडपट्टीत आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या ठिकाणी जवळपास 150 झोपडपट्ट्या आहेत. जसजसा पाऊस वाढत आहे, तसतशी नागरिकांची धडकी भरत आहे. जागोजागी पवना आणि मुळा नदीपात्रालगत टाकलेले भराव, लोकवस्त्या व राडारोडा यामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्र अरुंद झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news