पिंपरी : भामा आसखेड प्रकल्पाच्या जबाबदारीतून कार्यकारी अभियंत्याला हटविले

पिंपरी : भामा आसखेड प्रकल्पाच्या जबाबदारीतून कार्यकारी अभियंत्याला हटविले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांच्याकडे भामा आसखेड प्रकल्पाची सोपवण्यात आलेली जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्या ऐवजी क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भामा आसखेड प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पाचे कामकाज गट्टूवार यांच्याकडे यापूर्वी सुपूर्द करण्यात आले होते. गट्टूवार यांच्याकडे स्थापत्य विभागाचे कामकाजही सोपवलेले आहे.

त्यामुळे त्यांना भामा आसखेड प्रकल्पाचे कामकाज पूर्णवेळ करणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील या कामाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी मगफ क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागप्रमुखांनी केलेली शिफारस विचारात घेऊन आयुक्तांच्या मान्यतेने उप आयुक्त विठ्ठल जोशी ( सामान्य प्रशासन विभाग) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news