अपघातग्रस्त विमान ‘पार्किंग बे’वरून हटविले

पुणेकरांचा विमान प्रवासासाठी होणारा विलंब टळणार: मुरलीधर मोहोळ
Minister of State for Cooperation and Civil Aviation Murlidhar Mohol
केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळFile Photo

पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर उभ्या असणार्‍या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी मिळाली. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणार्‍या विमानांचा विलंब टळणार आहे.

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत होते. सदरील विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असल्याने विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केंद्रीय मंत्री मोहोळ यांची चर्चा झाली होती.

Minister of State for Cooperation and Civil Aviation Murlidhar Mohol
धावपट्टी विस्तारावर थेट संरक्षणमंत्र्यांना पत्रच; केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भेट

वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल

अपघातग्रस्त विमान हटवल्याने याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळणार असून, कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. 10 पैकी 1 बे बंद असल्याचा मोठा परिमाण झाला होता. एका दिवसाला एका पार्किंग बेवर 8 ते 9 विमानांची ये-जा होत असते. मात्र, बे बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर 9 बेवर आला होता आणि याचमुळे वेळापत्रक कोलमडले होते, असे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

आम्ही अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष ‘पार्किंग बे’वर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत अपघातग्रस्त विमान पार्क करण्याचा पर्याय समोर आला. म्हणूनच तातडीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि भेटही घेतली. भेटीच्या 24 तासांच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news