पुणे : बापरे ! गायीने दिला दोन डोक्याच्या वासराला जन्म

File photo
File photo

माणिक पवार : 

नसरापूर :  या अद्वितीय जगात काहीही घडते, ज्याची कोणालाही अपेक्षा नसते. असाच आश्चर्यचकित प्रकार भोर तालुक्यातील एका गावामध्ये घडला असून चक्क गायीला दोन डोके, चार डोळे व तीन कान असलेला वासरू जन्माला आलं होतं . मात्र दोन डोकी घेऊन जन्माला आलेल्या वासराचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून गायीची देखील प्रकृती चिंताजनक आहे.

शेतकरी आत्माराम वाल्हेकर रा. कामथडी (ता. भोर ) असे शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने जपलेल्या एचएफ जातीच्या गायीने शुक्रवारी ( दि. ६ ) रोजी वासराला जन्म दिला. गायीने वार सोडल्यानंतर दोन डोके, चार डोळे व तीन कान असलेलं वासरू जन्माला आल्याची घटना पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. दोन डोकी असल्याने या वासराला खाण्यापिण्यातही खूप त्रास होत असल्याने त्याचा दुसऱ्या दिवशी शनिवारी ( दि. ७ ) रोजी मृत्यू झाला. तर चिंताजनक असलेल्या गायीवर उपचार सुरु आहे.

गायीच्या मालकाने सांगितले की, हे विचित्र वासरू त्यांच्या गायीचे तिसरे अपत्य आहे. याआधी जन्मलेल एक खोंड व दोन वासरू पूर्णपणे सुरक्षित होती. गाय वासरू देणार आहे, याची जाणीव होती. पण दोन डोक्याचे वासरू जन्माला येईल, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. वासरू प्रथमदर्शनी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. विचित्र प्रकरण पाहून डॉक्टरांसह ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले होते.

'नैसर्गिक प्रजननच्या काळात काही वेळा गुणसुत्राची गुंतागुंत झाल्यानंतर असे प्रकार घडतात. यामुळे अवयवमध्ये नानाविध बदल होत असतात.

                              – डॉ. एस. एस. प्रधान, पशुवैद्यकीय अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news