

खेड: राजगुरुनगर शहरातील मुस्लिम बांधवानी गुरुवारी ( दि १) पहलगाम घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तान आणि दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. दिलावर खान दर्ग्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. पहलगाम घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहुन आंदोलनाची सुरुवात झाली. (Latest Pune News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा बीमोड करावा त्याला आम्हा मुस्लिम बांधवांचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजगुरुनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, रफिक मोमिन, समीर मोमिन, अँड. इम्रान मोमिन, बाबा इनामदार,अबिद मोमिन, नौशाद तांबोळी, मोहसीन आतार, नाजीम इनामदार, सोयब आतार, अकिल शेख आदींनी निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलन सुरू असताना वाडा रस्त्यावर अनेक नागरिकांनी थांबुन आंदोलकांचे मनोगत ऐकले. पोलिस बंदोबस्त मोठा होता.