पुणे : विधानभवन, घोरपडी ते मुंढवा रस्त्यावरील दिवे ‘दिव्य’!

File photo
File photo
Published on
Updated on

शिवाजी शिंदे : 

पुणे : विधानभवन, घोरपडी ते मुंढवा या रस्त्यावरील पथदिव्यांची अवस्था अतिशय दयनीय असून, निम्म्याहून अधिक पथदिवे बंद आहेत. तर, कित्येक दिव्यांचा प्रकाश अंधुक पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या दिव्यांचा फायदा होताना दिसत नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भागातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे अंधार पसरलेला असतो. विधानभवन, घोरपडी ते मुंढवा या भागात रस्त्यावर एकूण 376 पथदिवे आहेत. त्यामधील 200 पथदिवे हे विधानभवन ते घोरपडी या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत समाविष्ट आहेत. या भागातून जाणार्‍या रस्त्यावर भारतीय लष्कराची विविध कार्यालये आहेत.

मात्र, या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. घोरपडीपर्यंत असलेल्या रस्त्यावरील पथदिव्यांमधील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद तसेच नादुरुस्तावस्थेत असलेले दिसून आले. उर्वरित पथदिव्यांचा प्रकाश अंधुक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे नागरिकांना अत्यंत अवघड होत आहे. या रस्त्यावर तीन ते चार हायमास्ट लॅम्प आहेत. मात्र, त्यांची उंची जास्त आहे. त्यांच्या कोणत्याही प्रकाशाचा लाभ वाहनचालकांना होत नाही. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत हे पथदिवे आहेत. त्यामुळे या पथदिव्यांची दुरुस्ती तसेच देखभाल बोर्ड प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या पथदिव्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. घोरपडी ते मुंढवा हा रस्ता पुणे महापालिकेच्या अंतर्गत येत आहे.

हायमास्ट लॅम्प, मात्र उजेड नाही!
घोरपडी ते मुंढवा या रस्त्यावर 176 पथदिवे आहेत, तर दोन चौकांमध्ये हायमास्ट लॅम्प आहेत. मात्र, या रस्त्यावरील दिव्यांची स्थिती देखील चांगली दिसून आली नाही. काही भागांत दिवे रस्त्याच्या मधोमध आहेत, तर काही पथदिवे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आहेत. परिणामी, अंधुक प्रकाश पडत आहे. या रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news