पुणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील वर्चस्वाची गणिते बदलणार

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील वर्चस्वाची गणिते बदलणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विकास सोसायट्या आणि ग्रामपंचयतीवर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्चस्वाची गणिते बदलणार असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने बाजार समिती कायद्यातील दुरुस्तीचे प्रारुप प्रसिध्द केले असून 31 जानेवारीअखेर त्यावर हरकती, सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये चौकशीअंती जिल्हा निवडणूक अधिकारी मतदार यादीमध्ये संबंधितांचे नाव त्यास योग्य वाटल्यास बदल करतील असे 16 जानेवारी रोजी प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात म्हटले आहे.

राज्यात 306 कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. बहुतांशी बाजार समित्यांच्या निवडणुका क्रमप्राप्त आहेत. दरम्यानच्या काळात राज्यात विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. मात्र, अंतिम मतदार यादीमध्ये त्यांची नावे समाविष्ट होण्यात अडचण होती. एकदा प्रारुप मतदार यादीवर सूचना, हरकती आल्यानंतरच निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यादी जाहीर करतात. मात्र, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1966 मधील मुख्य नियमाच्या नियम 7 मधील पोटकलम (4) नंतर पाचचा समावेश केला आहे.

त्यानुसार कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या समितीच्या बाबतीत किंवा जेव्हा कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतींनी व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वीकृत केले असेल. त्याबाबतीत पोट नियम प्रसिध्द केलेल्या मतदारांच्या अंतिम यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव समाविष्ट नाही अशा कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी जिल्हा निवडणूक अधिकार्‍याकडे अर्ज करता येईल. जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी नेमलेली व्यक्ती त्यावर चौकशी करून अहवाल देईल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यांदीमध्ये त्यास योग्य वाटेल असे आवश्यक ते बदल करील.

नाव नोेंदणीस आले महत्त्व
कृषि उत्पन्न बाजार समितीवर विकास सोसायटी मतदार संघातून 11 संचालक निवडून येतात. तर विकास सोसायटी मतदार संघातून 4 संचालक निवडून दिले जातात. त्यामुळे नव्याने निवडणुका होऊन सोसायटी व ग्रामपंचायतीवर विराजमान झालेल्या सदस्यांना बाजार समितीच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. त्यादृष्टीने राजकीयदृष्ट्याही मतदार नाव नोंदणीस महत्त्व आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news