पुणे : बँकेला लोन कौन्सिलरनेच घातला 47 कोटींचा गंडा

पुणे : बँकेला लोन कौन्सिलरनेच घातला 47 कोटींचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहन कर्ज प्रकरणासाठी नेमलेल्या अ‍ॅटो लोन कौन्सिलरने संगनमत करून स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल 47 कोटी 65 लाख 26 हजार रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य नंदकुमार सेठीया (रा. प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत 2017 ते 2019 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या युनिर्व्हसिटी व टिळक रोड शाखांमधून 2017 ते 2019 यादरम्यान 46 वाहन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये ही प्रकरणे संशयित असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वैरागकर अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news