पुणे : कोकणातील जांभूळ बाजारात

पुणे : कोकणातील जांभूळ बाजारात
Published on
Updated on

पुणे : प्रतिनिधी :  रानमेवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जांभळाची कोकणातून आवक सुरू झाली आहे. चवीला काहीशी तुरट गोड, गडद रंग असलेली जांभळे बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून 13 किलोच्या चार बॉक्सची आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार दहा किलोस 2200 ते 2800 रुपये दर मिळाला. यापुढे जांभळाची मोठी आवक अपेक्षित असल्याची माहिती व्यापारी शिवाजी भोसले यांनी दिली.

भोसले म्हणाले की, हंगामाची सुरुवात झाल्याने 13 किलोच्या चार बॉक्सची आवक झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग येथून ही पेटी बाजारात दाखल झाली आहे. यंदा उत्पादन चांगले असून, दरही चांगले मिळत आहेत. येत्या काळात जांभळाची आवक वाढेल. कोकणी जांभळे ही काहीशी तुरट व रंगाने गडद असतात. त्यांना पल्प तयार करणार्‍यांकडून मोठी मागणी राहते. जांभळाची आवक सध्या साधारण असून, येत्या दहा दिवसांत ती आणखी वाढेल. कोकणातील जांभळांचा हंगाम जूनअखेरपर्यंत सुरू राहील, असा अंदाजही
त्यांनी वर्तविला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news