मासळी महाग; मटण, चिकनचे भाव स्थिर

मासळी महाग; मटण, चिकनचे भाव स्थिर
Published on
Updated on

पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 14) खोल समुद्रातील मासळीची 15 टन, खाडीची 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली. मासळी बाजारात मासळीची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर लग्नसराई, आंब्याचा हंगाम यामुळे मासळीला ग्राहकांकडून मागणी कमी आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त कमी झाल्याने मासळीच्या दरामध्ये तब्बल 10 ते 20 टक्के भाववाढ झाली आहे. चिकन आणि मटणचे भाव स्थिर असल्याची माहिती ठाकुर परदेशी, रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1400-1500, लहान : 900-1000, भिला : 500-600, हलवा : 800-900, सुरमई : 900-1000, रावस : 800-900, घोळ : 750, करली : 400-480, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 400-440, पाला : 700-800 आणि 1200-1300, वाम : 700-1000, ओले बोंबील : 200-240. कोळंबी : लहान 180-280, मोठी : 360-750, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1700-1800, मोरी : 300-360, मांदेली : 100-120, राणीमासा : 200-300, खेकडे : 200-240, चिंबोर्या : 480-550.

खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 300-360, नगली : 400-440, तांबोशी : 400-480, पालू : 200-240, लेपा : 200-240, बांगडा : लहान 80-100 मोठा 120-140, शेवटे : 200-240, पेडवी : 100, बेळुंजी : 120-140, खुबे : 100-120, तिसर्या : 200-240 तारली : 120-140, चिलापी ः 50-100.

नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-480, शिवडा : 240-280, खवली : 300-360, आम्ळी : 160-180, खेकडे : 400-480, वाम : 500-550.

मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 920, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 485, डझन 72, प्रतिनग 6.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news