पुणे : एकच मिशन… जुनी पेन्शन ! या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणले

पुणे : एकच मिशन… जुनी पेन्शन ! या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणले
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कर्मचारी शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यासाठी सहभागी झाले.

पुनर्वसन शाखा.. वेळ : सकाळी 11वाजून 55 मिनिट

पुनर्वसन शाखेत शुकशुकाट होता. यावेळी एक तरुण आंबेगाव तालुक्यातून आलेला. त्याला संबंधित टेबलच्या अधिकऱ्यांनी आज बोलावलं होतं. डिंभे धरणात जमीन गेली आहे, 2002मध्ये मिळालेली जमीन ही पूर्णपणे खडकाळ आहे, मोजणीनंतर हा प्रकार समोर आला. आता ती बदलून हवी.. त्यामुळे मी आलो आहे..

जिल्हा पुरवठा विभाग सकाळी : 12 वाजून 7 मिनीट

तीन ते चार कर्मचारी बसलेली होती. विभागाचे उपजिल्हाधिकारी सुरेखा माने ह्या आपल्या कक्षात बसून होते. यावेळी एक तक्रारदार आपले म्हणणे मांडत होता. परंतु, बहुतांश टेबल रिकामे होते.

  • जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात अधिकारी बसून आहेत. मात्र सर्व टेबल रिकामे आहेत. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पुन्हा यावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमोशन होऊन नायब तहसीलदार झालेले अधिकारी ही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कामकाज पुर्णपणे कोलमडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news