ठाकरे दिशाभूल करून संभ्रम निर्माण करताहेत : पणनमंत्री अब्दुल सत्तार

ठाकरे दिशाभूल करून संभ्रम निर्माण करताहेत : पणनमंत्री अब्दुल सत्तार

पुणे : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील उणिवा सांगत उद्धव ठाकरे दिशाभूल करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीका पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले असून, आता 'दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,' असेही ते म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही.

16 पैकी मीसुद्धा एक आमदार आहे. विधानसभा अध्यक्षांना जे काही घटनात्मक अधिकार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय दिला. तसेच, त्यावेळेचा एबी फॉर्म सत्य होता, आम्ही निवडणूक लढली आणि अमित शहा यांनी युती केल्यानंतर 2019 घडलेले महाभारत सर्वांना माहिती आहे. सत्तेत येण्यासाठी युती तोडली गेली? ती का तोडली याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. चिन्ह व नाव एकनाथ शिंदे यांनाच मिळाले आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील फरक निकालानुसार दिलेला आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे असलेले आमदार व पक्ष हाच शिवसेना हाच असून सर्व आमदारांना व्हीप मान्य करावा लागेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचा निकालही आमच्यासारखाच अपेक्षित

महायुतीमध्ये समन्वय समितीमध्ये चर्चा होत असून जागा वाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जो निर्णय घेतील, तो अंतिम आहे. राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार? याबद्दल छेडले असता शिवसेनेचा निकाल जो लागला, तेवढीच संख्या अजित पवार यांच्याकडे असल्याने आमच्यासारखाच राष्ट्रवादीचाही निकाल लागण्याची शक्यता असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे.

हातकणंगलेची जागा शिवसेनेचीच

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभेची जागा लढविणार असून महायुतीकडे मागणी केली असल्याबद्दल ते म्हणाले. खासदार धैर्यशील माने तेथे चांगले काम करत आहेत. ही जागा शिवसेनेचीच राहणार असून खोत यांना देण्याचा प्रश्नच नाही. पणन विभागाने आठवडे बाजार बंद केल्याने खोत यांनी केलेल्या तक्रारीवर ते म्हणाले, त्यांनी काय म्हटलं ते मला माहिती नाही. शेतमाल विक्री केल्यानंतर मार्केटयार्डामध्ये 24 तासांच्या आत पैसे दिले जातात. एक रुपयांत पीक विमा माझ्या कारकीर्दीत झाला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news