टीईटी परीक्षा आता ऑगस्ट महिन्यात..

टीईटी परीक्षा आता ऑगस्ट महिन्यात..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षेकडे अनेक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. परंतु परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू असून, येत्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उमेदवारांना आणखी काही दिवस परीक्षेची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. काही जिल्ह्यांत पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, काही ठिकाणी लोकसभा व विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, टीईटी घोटाळा समोर आल्यावर 2021 नंतर एकही टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यातच टीईटी परीक्षा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन यावर लवकर निर्णय झाला नाही. मात्र, आता टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असून, त्यादृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे तयारी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे म्हणाले, परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news