टीईटी बोगस उमेदवार ‘पवित्र’मधून बाहेर; 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र भरण्याची संधी

टीईटी बोगस उमेदवार ‘पवित्र’मधून बाहेर; 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र भरण्याची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केल्यामुळे ज्या उमेदवारांची नावे परीक्षा परिषदेने जाहीर केली आहेत, अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर, नुकत्याच झालेल्या अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी परीक्षेतील उमेदवारांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र भरता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. सन 2018 व 2019 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिकेनुसार दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे.

यामुळे संबंधित उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 ही ऑनलाइन दिनांक 22 फेब—ुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे. या चाचणीसाठी 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. ज्या उमेदवारांच्या टीईटी आणि सीटीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल, अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडून उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा व संबंधित कागदपत्रांसह संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2019 मध्ये पवित्र पोर्टलमार्फत 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार यांच्याजागी पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news