पिंपरी : ‘झिरो वेस्ट’ राबविल्यास भाड्यात दहा टक्के सवलत

पिंपरी :  ‘झिरो वेस्ट’ राबविल्यास भाड्यात दहा टक्के सवलत
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात कचर्‍यांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. पालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळांचे मैदान आदी ठिकाणी झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास बुकींच्या भाड्यात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेने
केले आहे.  पालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान येथे नागरिक, संघटना, संस्था, मंडळे, कंपनी व इतरांनी झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास भाड्यात 10 टक्के सलवत देण्याची योजना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सुरू केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची माहिती प्रदर्शित करण्यासाठी प्लास्टिक, फ्लेक्स पोस्टर्स, चिन्हे यांचा वापर करू नये. कापड, ताग, कागद या इको-फ—ेंडली सामग्रीवर सर्व पोस्टर्स व चिन्हे छापावीत. सजावटसाठी प्लास्टिकची फुले वापरू नयेत. फूट ऑपरेटेड सॅनिटायझर मशीन प्रवेशद्वार व इतर आवश्यक ठिकाणी ठेवाव्यात.  दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासाठी रम्प व व्हील चेअरची सुविधा असावी. पाहुण्यांची नोंदणीकरिता लॅपटॉप, टॅबचा वापर करावा. नेमटॅग व सहभागी प्रतिनिधी यांची नावे दर्शविण्यासाठी कार्डबोर्ड, ज्यूट, कापडाचा वापर करावा. भेट देण्यासाठी प्लास्टीक, थर्माकोल, फोम याचा वापर न करता स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छाग्रह याचा लोगो वापरून कापड, ज्युट यापासून बनविलेल्या वस्तू, रोपे, स्टीलचे वस्तू, कापडी मास्क आदी वस्तूंचा वापर करण्यात यावा. कार्यक्रम पत्रिका, कागदपत्रे, प्रकाशन, निमंत्रण यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा.

पाण्यासाठी करीता प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये. पिण्यासाठी काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लास किंवा बाटलीचा वापर करावा. प्लास्टिकचे कटलरी, कप, प्लेट यांचा वापर करू नये. बायो-डिग्रेडेबल पर्यावरणपूरक कटलरी, कप, प्लेटचा वापर करावा. कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बुकलेट, पॅम्प्लेट, माहितीपत्रकाचा वापर न करता ते वेबसाईट, व्हाटस अ‍ॅप, सादरीकरण, ई-मेल किंवा क्यूआर कोडचा वापर करावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात बाहेरील खाद्यपदार्थ व पेय आदींचा वापर करू नये. ओल्या कचर्‍यासाठी हिरवी व सुका कचरा, यासाठी निळी डस्टबीन सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवावीत.

अन्न वाया जाणार नाही, याकरिता आयोजकांनी आश्रम व स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करून उरलेले अन्न द्यावे. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था असावी. महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड गुंडाळण्यासाठी वेस्टपेपर, सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी वेस्ट लेबलचे लाल रंगाचे डस्टबीन ठेवावेत. स्वच्छतागृहांमध्ये स्पर्श न होईल अशा प्रकारे सेन्सर साबण डिस्पेंसर आणि सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन असावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news