पुणे : तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर

पुणे : तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 ची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्यासाठी 28 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. एमपीएससीने प्रसिद्धि पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

17 डिसेंबरला महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 घेण्यात आली होती. त्यानंतर आता पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांना उत्तरतालिकेवरील हरकती केवळ ऑनलाइन पद्धतीनेच नोंदविता येतील. अन्य कोणत्याही पद्धतीने नोंदविलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच, 28 डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news