

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून आज (दि. १०) अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलाचे नाव ऋषिराज सावंत असे असून तो नऱ्हे येथील सावंत यांच्या कॉलेजचे काम सांभाळतो. आज अचानक दुपारी तीन नंतर ऋषिराजचा फोन बंद आला. बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केली.
दरम्यान, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर येत आहे. ऋषिकेश प्रायव्हेट चार्टड विमानाने बँकॉक कडे जात असल्याचे यंत्रणांना समजले. संबंधित पायलटशी बोलून अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेल्या ऋषिराजला परत बोलावले आहे. त्यामुळे ही घटना अपहरण की ऋषिराज स्वतःहून गेला. याबद्दल अजूनही संभ्रम वाढला आहे.
तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस अलर्ट झालेले आहेत. त्यांचा मुलगा ऋषिराज हा पुण्याहून चार्टड प्लेनने निघाला आहे. विमान कोणत्या दिशेला गेलं याची माहिती आम्ही घेत असून विमान परत आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे.
आमचे रोज दिवसातून १५ ते २० फोन होतात. पण आज कोणतेच बोलणे झाले नाही. मुलासोबत अनोळखी कोणीच नाही.त्याचे मित्रच सोबत आहेत. मुलगा स्वत: च्या गाडीने न जाता दुस-याच्या गाडीने विमानतळावर गेला. चार्टड प्लेन कोणत्या दिशेने गेले आहे याची माहिती नाही, असे तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.