

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे परिसरात दोन दिवसापासुन परतीच्या पावसानेनिरोप घेतला असून रविवारी अल्हाददायक सुर्यदर्शन झाले. अनेक दिवसानंतर पावसाचे वातावरण गेल्यामुळे आणि आकाश निरभ्र होवून स्वच्छ वातावरण झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. पाऊस उघडल्यामुळे आणि दिवाळीचा सण असल्यामुळे नागरिकांचा खरेदीचा उत्साह वाढला असुन बाजारपेठेत,फटाक्यांच्या दुकानात तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे.
गुलाबी थंडीही पडण्यास सुरवात झाली आहे पाऊस उघडल्यामुळे मॉर्निंग वॉक करणा-यांची संख्या वाढली असून नागरिक सायकलींग, रनींगही करीत आहेत यामध्ये शाळकरी मुले, तरुणाई, जेष्ठ नागरिक, वृध्द, महिलांचाही सहभाग दिसून येत आहे.