तळेगाव स्टेशन : वैद्यकीय अधिकारी आनंद साबळे यांचे अपघाती निधन

तळेगाव स्टेशन : वैद्यकीय अधिकारी आनंद साबळे यांचे अपघाती निधन

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व मावळ तालुका आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आनंद साबळे (वय ५०रा.तळेगाव स्टेशन ता.मावळ) यांचे अपघातात निधन झाले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास साबळे कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला. तळेगाव येथे मराठा क्रांती चौक परिसरात साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. साबळे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

उपचारादरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. साबळे टाकवे ता.मावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. सर्वांशी आदराने बोलणे आपुलकीने विचारपूस करणे वैद्यकीय माहिती देण्यासाठी नेहमी सहकार्य करणारे म्हणून ते परिचित होते. आनंद साबळे यांचे निधन झाल्याने तळेगाव दाभाडे आणि टाकवे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news