तळेगाव दाभाडे : तळेगावातील इच्छुक पुन्हा झाले सक्रिय

Talegaon Dabhade: Aspirants from Talegaon became active again
Talegaon Dabhade: Aspirants from Talegaon became active again
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वात्रिक निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वांचे डोळे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिल्याने मध्यंतरी इच्छुकांचा मंदावलेला प्रचार आता पुन्हा वेगाने सुरू झाल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तर काही जण अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मागील निवडणूक 14 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. त्यावेळी नगर परिषदेचे 13 प्रभाग आणि 26 उमेदवार निश्चित होते. या वेळी मात्र वाढलेल्या लोकसंख्येमुळे 14 प्रभाग आणि 28 उमेदवार निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. तर, या वेळी द्विसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या नियोजनाची जोरदार तयारी चालवलेली असून 14 प्रभागात कोणते उमेदवार इच्छुक आहेत. याचा अंदाज प्रशासकीय राजवट लागल्यापासून घेतला जात होता. तर, एखाद्या उमेदवाराला पक्षाने दिलेल्या उमेदवारीबाबत मतदारांचे त्याविषयीचे मत काय आहे याचा कानोसा घेतला जात आहे.

त्या प्रभागात त्या उमेदवाराचे असलेले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्य इत्यादीबाबत गुप्तपणे माहितीचा कानोसा काढण्याचे काम विविध पक्षांचे श्रेष्ठी करत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने चौदा प्रभागांत महिलांना संधी मिळू शकते. तर. इतर आरक्षणाबाबत सर्वांना संभ्रम आहे.

पूर्वी झालेल्या प्रभाग रचनेची तोंडी माहिती नुसार इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते आपले वेगवेगळे आडाखे बांधत आहेत. त्यांच्यातून रस्त्याच्या पलीकडचा भाग या प्रभागात जोडला आहे, या बोळीतून हा प्रभाग तोडला आहे, हा प्रभाग या पक्षाला सुरक्षित आहे, दुसरा प्रभाग त्या उमेदवाराला निवडणुकीसाठी योग्य राहील, अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

एका प्रभागांमध्ये जास्तीत जास्त चार हजारांपर्यंत मतदारांची संख्या असेल. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशान्वये निवडणुकीची आचारसंहिता कधी जाहीर होते. याबाबत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधान येत असल्याचे दिसून येत आहे.

अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची प्रतीक्षा

सध्या निवडणुकीचे वेध सर्वच इच्छुक उमेदवारांना लागलेले असून काही इच्छुक उमेदवारांनी पुन्हा जनसंपर्क मोहिमेवर भर दिलेला दिसत आहे. आपल्या विभागातील मतदारांच्या भेटीगाठी तसेच अन्य माध्यमातून आपला संपर्क वाढविला जात आहे.

नगर परिषदेच्या प्रशासनाने प्रभाग रचनेचा आरखडा निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेला होता. तोच मंजूर होतो कि नव्याने प्रभाग रचना होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.

https://youtu.be/uRpprmHUGnM

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news