मावळ: महावितरणच्या खांबामुळे अपघाताचा धोका

मावळ: महावितरणच्या खांबामुळे अपघाताचा धोका

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील कान्हे ते टाकवे बुद्रुक रस्त्याचे चार महिन्यांपूर्वी प्रशासनाने काम पूर्ण केले आहे. परंतु, महावितरणचे विद्युत खांब रस्त्यात आल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्याने या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच, ओद्योगिक वसाहत असल्यामुळे परिसरात कामगारांची वर्दळ असते. परंतु, रस्त्यात आलेल्या महावितरण विद्युत खांबामुळे अपघाताची धोका आहे. महावितरणच्या चुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून कान्हे फाटा ते टाकवे बुद्रुक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाला मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली. हे काम पूर्णतत्वास येत असताना महावितरण वडगाव मावळ व सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ यामध्ये समनवय नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण होत असताना महावितरणचे विद्युत वाहक लाईन व पोल रस्त्यामध्ये आले आहेत. या ठिकाणी कान्हे येथील महिंद्रा कंपनी समोरील या दोन ते तीन खांबांमुळे अपघाताची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news