Takli Haji Theft: टाकळी हाजीतील शिनगरवाडीत अल्पवयीनांकडून चोरी व तोडफोड; ग्रामस्थांमध्ये भीती

शाळा, आरओ प्लांट व दुकाने लक्ष्य; चार मुलांना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांत तक्रार, टोळी कार्यरत असल्याचा संशय
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

टाकळी हाजी: शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिनगरवाडीत अल्पवयीन मुलांकडून सातत्याने चोरी व तोडफोडीचे प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले. या प्रकारांमुळे ग््राामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Theft
Indapur Jilha Parishad Political Equations: इंदापूर राष्ट्रवादीमय; ‘वजनदार खुर्ची’साठी नव्या राजकीय समीकरणांची कुजबुज

शिनगरवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये कॅमेरे फोडणे, शैक्षणिक साहित्याचे नुकसान करणे, बोअरवेलची केबल तोडणे, वर्गखोलीत जाणूनबुजून लघुशंका, अस्वच्छता करणे असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हे सर्व प्रकार घडण्यामागे नक्की काय कारण असावे याबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा झडत आहेत. यासोबतच येथील किराणा दुकानात चोरीचे प्रकारही घडले आहेत.

Theft
Malegaon Sugar Factory Chairman Appointment: माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता

टाकळी हाजी ग््राामपंचायतीने शिनगरवाडीसाठी बसविलेल्या आर. ओ. फिल्टरच्या शटरचे लॉक तीनवेळा तोडून कटावणीच्या साहाय्याने उचकून कॉइन बॉक्समधील रक्कम चोरून नेण्यात आली. विशेष म्हणजे कॉइन बॉक्ससाठी बनावट चावी तयार करण्यात आल्याचेही ग््राामस्थांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, येथील ग््राामस्थांनी रात्रीच्या वेळी चोरी करताना 4 अल्पवयीन मुलांना रंगेहाथ पकडले. यानंतर ग््राामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली आहे.

Theft
White Revolution 2.0: श्वेतक्रांती 2.0 ने दुग्धक्षेत्रात मोठी झेप; महाराष्ट्रात 2029 पर्यंत 2,500 नव्या दूध संस्था

यापूर्वीही परिसरात घरफोडी, शेतातील साहित्यचोरी, कृषिपंप चोरी, केबलचोरी, विद्युत रोहित्रांचे नुकसान अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच बाहेरून आलेल्या मजुरांच्या साहित्यामधून पैशांची चोरी झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

Theft
Kasturi Club Haldi Kunku Event: नऊवारी साडी, उखाणे आणि कलाकारांसोबत धम्माल; ‘कस्तुरी क्लब’चा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे या मागे कोणीतरी मोठी टोळी कार्यरत असल्याची शंका ग््राामस्थांकडून व्यक्त केली जात असून, शिरूर पोलिसांकडून सखोल तपास व्हावा अशी मागणी ग््राामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news