संधीचा फायदा घेऊन यश मिळवा : प्रा. संजय चोरडिया
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईझ अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपले स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करण्यावर अधिक भर द्यावा. दै. 'पुढारी'ने महिला-मुलींसाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले असून, त्याचा महिला खेळाडूंनी फायदा करून घ्यावा. प्रत्येक स्पर्धेत यश-अपयश ठरलेले असते. मात्र, स्वतःच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित केले, तर नक्कीच यश मिळेल. दै. 'पुढारी'कडून नेहमीच अशाप्रकारचे स्तुत्य उपक्रम राबविले जात असतात, असे प्रतिपादन सूर्यदत्ता इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
दै. 'पुढारी'च्या वतीने आणि पुणे डिस्ट्रीक्ट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनच्या सहकार्याने 'राईझ अप' पुणे महिला जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा कर्वे रोड येथील टिळक टँकवर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एमआयटीच्या व्हिज्युल आर्ट्स स्कूल ऑफ डिझाईनच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. श्रृती निगुडकर, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय रजपूत, टिळक तलावाचे सचिव अमित गोळवळकर, दै. 'पुढारी'च्या मार्केटिंगचे नॅशनल हेड आनंद दत्ता, मार्केटिंगचे पुणे प्रमुख संतोष धुमाळ, हरीश हिंगणे यांसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. निगुडकर म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात महिलांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे ताण-तणावाचे वातावरणही असते. या ताण-तणावातून बाहेर येण्यासाठी महिलांनी एक तरी क्रीडा प्रकार खेळला पाहिजे. महिला आणि मुलींना विविध स्पर्धांमधून व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दै. 'पुढारी' आयोजित क्रीडा स्पर्धा वारंवार होणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रातील एकमेव दै. 'पुढारी' दैनिकाने महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
रजपूत म्हणाले, दै. 'पुढारी'च्या वतीने केवळ मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करून नक्कीच स्तुत्य उपक्रम राबविला आहे. अशा उपक्रमात आम्हालाही सहकार्य करण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळात दै. 'पुढारी'कडून अशाच उपक्रमांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धुमाळ यांनी केले. दै. 'पुढारी'च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवुन देण्याच्या उद्देशाने 'राईझ अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या राईझ अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धाही उत्साहात पार पडल्या असून, जलतरण स्पर्धांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. 'पुढारी' हा एकमेव माध्यम समूह आहे.
या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य
मिळाले आहे.
48 प्रकारांत जलतरण
ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत पुणे शहर,
पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथून मोठ्या प्रमाणात महिला जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सात वर्षांखालील, नऊ वर्षांखालील, अकरा वर्षांखालील, तेरा वर्षांखालील, पंधरा वर्षांखालील आणि सतरा वर्षांखालील वयोगट सहभागी होणार असून, 48 विविध प्रकारात सुरू आहेत.
दै. 'पुढारी'च्या वतीने केवळ महिलांसाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ही मोठी कौतुकाची बाब आहे. मुलींनी अशा स्पर्धा केवळ स्पर्धा म्हणून किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी नाही तर मानसिक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी खेळाव्यात.
– डॉ. श्रृती निगुडकर
(प्रोग्राम डायरेक्टर, एमआयटीच्या व्हिज्युल आर्टस स्कूल ऑफ डिझाईन)
हेही वाचा