मिनी बस घ्या..!

मिनी बस घ्या..!
Published on
Updated on

पुणे : पीएमपीसाठी वातानुकूलित ई-डबलडेकर बस खरेदी करण्याची योजना ही धोरणात्मक चूक ठरणार असून, त्याऐवजी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांना जवळच्या अंतरात ये-जा करण्यासाठी मिनी बस खरेदी कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी शुक्रवारी केली. सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्चून 20 डबलडेकर बस खरेदी करण्याऐवजी तेवढ्याच किमतीत सुमारे 100 मिनी बसगाड्या खरेदी करता येतील, असे मत त्यांनी मांडले.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी निवेदन पाठविले आहे. पीएमपी प्रशासनाने डबलडेकर बस खरेदीच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा. या प्रस्तावाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून प्रवाशांना उपयुक्त ठरणा-या गाड्या खरेदी कराव्यात, अशी सूचना त्यांनी पीएमपीचे अध्यक्ष संजय कोलते यांना पत्राद्वारे केली आहे.
निम्हण म्हणाले, पुण्यात तीन मार्गांवर सुमारे 56 किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वे सुरू होत असून, त्याचा विस्तार होणार आहे. पुण्यात दोन्ही महापालिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे.

मेट्रोचे पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यामधून डबल डेकर धावण्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग उपलब्ध होणार नाहीत. मेट्रोच्या पुलामुळे मुठा नदीवरील पुलावरून डबलडेकर बस जाऊ शकणार नाही. सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता येथे उड्डाणपुणामुळे डबल डेकरला जाता येणार नाही. त्या मार्गावर मेट्रोचाही प्रस्ताव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधून ती धावू शकणार नाही. तशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहरात आहे.

निम्हण म्हणाले, डबलडेकर बससेवा निरुपयोगी ठरल्याचे लक्षात आल्याने तीन दशकांपूर्वी तत्कालीन पीएमटी प्रशासनाने डबलडेकर गाड्या ताफ्यातून काढून टाकल्या होत्या. दुसरी बाब म्हणजे बीआरटी बससेवा सुरू करताना घेतलेल्या दहा वातानुकूलित गाड्या चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्या बंद केल्या. 33 कोटी खर्च करून सात-आठ वर्षांपूर्वी केलेला नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग पुन्हा काढायचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news