दहावी-बारावीचे वेळापत्रक ‘सीआयएससीई’कडून जाहीर

दहावी-बारावीचे वेळापत्रक ‘सीआयएससीई’कडून जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी मंडळाच्या लळीलश. ेीस या संकेतस्थळावरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. सीआयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर बारावीच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षा 21फेब्रुवारीला सुरू होणार असून, 28 मार्चपर्यंत चालणार आहे. शेवटचा कला विषयाचा पेपर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर इतर विषयांसाठी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत परीक्षा होईल. कला विषयाच्या पेपरचा कालावधी 3 तास आणि इतर विषयांचा कालावधी 2 तासांचा असेल. बारावीच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 3 एप्रिल 2024 रोजी संपतील. परीक्षा सर्व दिवस दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल. परीक्षेचा निकाल मे 2024 मध्ये घोषित केला जाणार असल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news