मुंबई : ताडवाडी सार्वजनिक मंडळाच्या होलीकोउत्सवाची १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल | पुढारी

मुंबई : ताडवाडी सार्वजनिक मंडळाच्या होलीकोउत्सवाची १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : इंग्रजांच्या काळापासून आपल्या रूढी परंपरा सण उत्सव ह्यांची जपणूक करत गिरगावातील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरच्या ताडवाडी सार्वजनिक मंडळाच्या होलीकोउत्सवाची वाटचाल शतकोत्तर १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे सुरू झाली आहे. गेल्या ११८ वर्षापासून ताडवडीतील तब्बल ४०० पेक्षा जास्त रहिवास मिळून हा उत्सव मोठ्या भक्ती भाव, आनंदाने तसेच पारंपारिक पद्धतीने साजरा करत आले आहेत.
कोकणात चालत आलेल्या पूर्वपार परंपरेनुसार आजही होळीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फांद्या वापरून होळी उभारून पूजा केली जाते ह्या मध्ये मुखयतहा भेंडी, एरंडेल, अंबा, केळी आणि इतर झाडांच्या फांद्यांनाचा वापर केला जातो होळीच्या आधी येणाऱ्या पंचमी पासून होळीच्या नंतर येणाऱ्या पंचमी पर्यंत होळी पेटत ठेवण्याची प्रथा आहे.आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळी जवळ येऊन अनेक जण गाराणे घालत असतत तर इच्छा पूर्ण झाल्यावर अनेक जण येऊन आपल्या मनानुसर कोंबडया, बोकड आणि असंख्य साड्या चोळ्या होळीला भेट देऊन जातात.जमलेल्या सर्व साड्या होळी नंतर आदिवासी पाड्यातला गरीब महिलांना दरवर्षी दान केल्या जातात.
ताडवडीत होलीकोत्सवाची सुरुवात दामू मास्तर आणि कृष्ण डेरे ह्यांनी ब्रिटिश काळात सुरू केली होती. तेव्हापासून परंपरेनुसारच ताडवाडीत होळी साजरी केली जाते.होळीला अग्नी देण्याचा मान वयस्क आणि माहितगार व्यक्तींना दिला जातो त्या आधी सर्वजण मिळून हातात गवताच्या पात्या घेऊन पाच फेऱ्या मरतात त्यानंतर होळी पेटवली जाते. त्या नंतर प्रथेनुसार बोंब मारली जाते. काही वर्षांपासून इथे कोकण महोत्सवी भरला जात आहे त्यातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार देखील रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
वाडी सोडून गेलेली मंडळी होलिको उत्सवाला आवर्जून आणि न विसरता येत असतात. होळीला दरवर्षी कमीत कमी २५०/३०० च्या वर साड्या भाविक भेट देऊन जातात तर जवळजवळ पंधरा गोणी नारळ भविकान तर्फे होळीला अर्पण केले जातात ह्या नारळाचा नंतर प्रसाद करून रहिवाशांना वाटप केल जाते अश्या प्रकारे ताडवाडीतील होलिकोउत्सव गेल्या ११८ वर्षां पासून साजरा केला जात आहे दक्षिण मुंबई परिसरातील नगिकांसह आणि छोट्या पासून अगदी मोठ्या राजकीय व्यक्तीपर्यंत अनेक जण ताडवाडीतल्या होळीला नतमस्तक होऊन जातात.

Back to top button