ST Accident: स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी

ज्येष्ठ प्रवाशाच्या अपघातावर प्राथमिक तपास अहवाल स्पष्ट — बसस्थानकांवरील सुरक्षा उपाययोजनांकडे पुन्हा लक्ष
ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
ST News : स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारीPudhari Photo
Published on
Updated on

पुणे : स्वारगेट बसस्थानकात झालेल्या ज्येष्ठ नागरिक अपघात या दुर्दैवी घटनेसाठी बसचालक दोषी असल्याचा निष्कर्ष प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक अहवालातील ही माहिती समोर आली असून, लवकरच या दोषी चालकावर खातेअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.08) रोजी दै.‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.(Latest Pune News)

ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
Rabies Vaccine Shortage: यवत ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा!

स्वारगेट आगारात बस मागे घेताना गुरुवारी (दि.06) सायंकाळच्या सुमारास बस मागे घेताना, त्याखाली सापडून शिवाजी कानडे (वय - 65 ते 70) या ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर सातारा रस्त्यावरील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पायाला झालेली गंभीर जखम आणि वयोमानानुसार त्यांना असलेला मधुमेहाचा त्रास, यामुळे डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला. त्यामुळे हे ज्येष्ठ प्रवासी आता कायमचे अपंग झाले. एसटीने आर्थिक मदत दिली.

रूग्णालयाचा खर्च केला तरी त्यांचा पाय काही आता पुन्हा परत येणार नाही, त्यामुळे अशा बेजबाबदार चालक-वाहकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार दै.‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीने घटना कशी घडली, या घटनेत जबाबदार कोण होते, त्यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार, याची माहिती एसटीच्या पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडून घेतली. त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, स्वारगेट एसटी आगारात झालेला ज्येष्ठ नागरिकाचा अपघात हा फलटण आगाराकडील बसने झाला होता. या अपघाताची आम्ही कसून तपासणी करून त्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे, आणि हा अहवाल फलटण आगाराकडे पाठवला आहे. या बसचा चालक दोषी असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबतचा अंतिम सविस्तर अहवाल बनविण्याचे काम सध्या आमच्याकडून सुरू आहे. हा अहवाल पूर्ण होताच, दोषी चालकावर खातेअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.

ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
Encroachment Action Stopped: अतिक्रमणांवर कारवाई ठप्प, क्षेत्रीय कार्यालये गप्प!

कठोर उपाययोजना करण्याची गरज

या घटनेमुळे बसस्थानकांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बसस्थानकांमध्ये वाहतूक नियमांचे, पार्किंगचे योग्य पालन व्हावे, यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.

स्वारगेट एसटी स्थानकावर ज्येष्ठ नागरिकाचा अपघात होऊन आता तीन दिवस उलटले आहेत. तरी देखील एसटी प्रशासन नुसते अहवाल तयार करत आहेत. एसटीच्या चालकावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्या जागी इतर वाहन चालक असता तर त्यावर प्रशासन तत्काळ आणि जोरदार कार्यवाही करते. मात्र एसटी चालकावर कारवाई करायला दिरंगाई का होत आहे. याशिवाय, स्वारगेट आगारात ज्येष्ठ महिला हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली. या प्रकरणात एसटी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

आनंद सप्तर्षी, प्रवासी अभ्यासक

ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
ZP election Ambegaon: शिनोली-बोरघर जिल्हा परिषद गटात निवडणुकीची चुरस; अनुसूचित जमाती महिला उमेदवारांसाठी राखीव

आगारांत हवीत तातडीची वैद्यकीय मदत केंद्रे

प्रवासी अभ्यासक वंडेकर यांचे मत

पुणे : एसटी बसस्थानकांचा दर्जा सुधारून त्यांना आधुनिक, प्रवासी-केंद्रित आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्य-सज्ज करण्याची तातडीची मागणी स्वारगेट ज्येष्ठ नागरिक अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता जोर धरू लागली आहे. सध्या अनेक बसस्थानकांवर सुरक्षितता, स्वच्छता, सुविधा आणि वैद्यकीय मदतीचा अभाव असल्याची गंभीर स्थिती आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी आवश्यक सोयींच्या कमतरतेवर प्रवासी अभ्यासकांनी बोट ठेवले आहे. तसेच त्यांनी राज्यातील सर्व आगारांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत केंद्रे लवकरात लवकर उभारण्याची मागणी देखील केली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या प्रसंगी मदतीसाठी बसस्थानकांवर त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे सर्वांत महत्त्वाचे आहे. सध्याच्या वातावरणीय बदलांमुळे आणि वाढत्या तापमानामुळे ज्येष्ठ प्रवाशांना प्रवासादरम्यान चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा इतर वैद्यकीय अडचणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी अभ्यासक धैर्यशील वंडेकर यांनी याबाबत तीव चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, बसस्थानकांवर वैद्यकीय मदत मिळणे, ही केवळ प्रवाशांसाठी सोय नसून, प्रवाशांचा मूलभूत हक्क आहे.

ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
Alandi Kartiki Wari Preparation: आळंदी शहर सज्ज कार्तिकी वारीसाठी; अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

प्रत्येक बसस्थानकात प्राथमिक उपचार केंद्र, ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर आणि प्रशिक्षित परिचारक किंवा सीपीआरचे प्रशिक्षण असलेले एसटी कर्मचारी चोवीस तास उपलब्ध असायला हवे, याकरिता एसटी महामंडळाने आणि खास करून परिवहनमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रवासी अभ्यासकांच्या स्वारगेट स्थानकाबाबत सूचना

बस पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी ‌‘पुण्यातील स्वारगेटसारख्या स्थानकांवर विशेष प्रशिक्षित ‌‘मार्शल्स‌’ची नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे मार्शल्स बसची हालचाल, पार्किंगचे नियमन करतील.

पुण्यासह इतर महानगरांतील बसस्थानके ‌‘स्मार्ट बस टर्मिनल‌’ संकल्पनेनुसार विकसित करावीत. यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, बस तिकिटांसाठी कियॉस्क, चोवीस तास कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा (24 तास वॉच) आणि प्रभावी तक्रार निवारण प्रणालीला प्राधान्य द्यावे.

ज्येष्ठ प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, बसमध्ये चढण्यासाठी सुलभ रॅम्प व्यवस्था आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता करणे अपेक्षित आहे

ST News |स्वारगेट अपघातात एसटी चालक दोषी; कठोर कारवाईची तयारी
Leopard sighting Junnar: पिंपरी पेंढारमध्ये पुन्हा बिबट्यांचा संचार; नागरिकांत भीतीचे वातावरण

एसटी सल्लागार समित्यांची तातडीने स्थापना करा

प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि आवश्यक सुधारणा घडविण्यासाठी प्रत्येक शहरात एसटी सल्लागार समित्या स्थापन करण्याची मागणी प्रवाशी अभ्यासक यांनी राज्याच्या परिवहनमंत्र्यांकडे केली आहे. या समित्यांमध्ये लोकप्रतिनिधी, पोलिस, महानगरपालिका, आरोग्य संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश असावा, जेणेकरून प्रत्येक दोन महिन्यांनी बससेवेतील अडचणींवर आढावा घेणे शक्य होईल.

एसटी महामंडळाने तातडीने जवळील शासकीय किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयांशी आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यासाठी औपचारिक करार करणे आवश्यक आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांसाठी बसस्थानके ज्येष्ठ-स्नेही बनविणे ही काळाची गरज आहे. आरोग्य सुविधांसोबतच स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा आणि आधुनिकीकरण यावरही भर देण्याची गरज आहे.

धैर्यशील वंडेकर, प्रवासी अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news