

पुणे : एसटीच्या पुणे विभागातील स्वारगेट आगारातून महाबळेश्वरसाठी ई-शिवाई वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे.
या बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या होणार आहेत. सकाळी 5.30, 6.30 वाजता आणि दुपारी 3 व 4 वाजता स्वारगेट आगारातून या बस सुटतील. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले.