

रावणगाव: स्वामी चिंचोलीसह रावणगाव व नंदादेवी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे, पूल, बंधारे, विजेचे खांब, रस्त्यांचे नुकसान झाले होते, याची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकल्या.
मे महिन्यात मान्सपूर्व पावसाने दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतींचे तसेच रहिवासी भागात प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन ग्रामस्थांकडून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी कार्यालयासह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. संबंधित अधिकार्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.(Latest Pune News)
या वेळी स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने, रावणगावच्या सरपंच निर्मला आटोळे, ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी उपसभापती उत्तम आटोळे, गणेश थोरात, अजित आटोळे, दिनकर आटोळे, मच्छिंद्र मदने, विजय दिवटे, सचिन गायकवाड, रामभाऊ कुटे, विजय काळे, रामभाऊ शेंद्रे उपस्थित होते.