Supriya Sule on Maratha Reservation| मराठा आरक्षणाबाबत सरकार असंवेदनशील: सुप्रिया सुळे
बारामती: मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं.. त्याची आठवण करून दिली पाहिजे...! आज ते सत्तेत आहेत.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे. 250 आमदार, 300 खासदार त्यांच्याकडे आहेत, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सोमवारी (दि. 1) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. (Latest Pune News)
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये घ्यावे, या मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत खा. सुळे म्हणाल्या, मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाबाबत जरांगे यांच्याशी चर्चा केली पाहिजे.
जो कोणी आंदोलनाला बसला आहे, त्यांचा मान-सन्मान लोकशाहीमध्ये झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघू शकतो.

