

पुणे: पुण्यात शुद्ध सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दराने 1 लाख 7 हजार रुपयांची पातळी गाठली आहे. तर, चांदीचा एक किलोचा भाव सव्वा लाख रुपयांवर गेला आहे. अमेरिकेने भारतावर लागू केलेली 50 टक्के शुल्कवाढ, रुपयाचे झालेले अवमूल्यन, व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. (Latest Pune News)
स्थानिक सराफी बाजारात 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 4 हजार 500 रुपयांवर गेला असून, तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएस टी) धरल्यास भाव 1 लाख 7 हजार600 रुपयांवर जातो. तर, 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव
95 हजार रुपये असून, जीएसटीसह रक्कम 97 हजार 850 रुपये होते. चांदीचा एक किलोचा भाव 1 लाख 23 हजार 500 रुपये असून, जीएसटीसह रक्कम 1 लाख 27 हजार रुपयांवर जाते, अशी माहिती सराफा व्यावसायिक वस्तुपाल रांका यांनी दिली.