Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत; जयंतीनिमित्त व्यक्त केल्या मन हेलावून टाकणाऱ्या भावना

सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल; आठवणी, सहवास आणि कुटुंबाविषयीच्या भावना व्यक्त करत भावनिक शब्दांत अभिवादन
Sunetra Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar Pudhari
Published on
Updated on

बारामती: राज्याच्या राजकारण नेतृत्वाची छाप निर्माण केलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी त्यांच्या सहवासातील क्षण, कुटुंबावरील प्रेम आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.

Sunetra Ajit Pawar
Pune Pothole Update: पुणे खड्डेमुक्त झाल्याचा PMC चा दावा! 15 दिवसांत 1,134 खड्डे बुजवले; 'रोडमित्र' ॲपही बंद

सुनेत्रावहिनी यांनी आपल्या संदेशात अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि विकासासाठीची त्यांची अविरत धडपड यांचे स्मरण केले. 'तुम्ही आज आमच्यात नसला, तरी तुमच्या आठवणी, विचार आणि कार्याचा सुगंध कायम आमच्या मनात दरवळत राहील,' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Sunetra Ajit Pawar
Pune Water Supply: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरात सध्या पाणीकपात नाही; नियमित पाणीपुरवठा सुरू

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देत अजितदादांना अभिवादन केले. अनेकांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रावहिनी यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या ठरल्या. त्यांच्या पोस्टमधून अजितदादांविषयीचे प्रेम, आदर आणि विरह स्पष्टपणे व्यक्त झाल्याने ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

Sunetra Ajit Pawar
Pune FDA Inspection: एफडीएच्या कारवाईचा मोठा परिणाम! पुण्यात चायनीज आणि हॉटेलमधून सिंथेटिक रंग गायब, स्वच्छतेवर भर

आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणतात...

दादा..

एवढी वर्षं तुमचा जन्म दिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला...

घर, कुटुंब आनंदात असायचं,

शुभेच्छांचा वर्षाव असायचा...

पण, आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय...

हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन

आजही अजिबात तयार होत नाही दादा...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वांत मोठी ताकद बनून सोबत राहिलात...

तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप

आणि मला दिलेली साथ...

आज हे सगळं अचानक हरवून गेलंय,

Sunetra Ajit Pawar
Pune FDA Action: एफडीएच्या धडक कारवाईचा पुण्यात मोठा परिणाम! हॉटेलमधून भजी गायब, मेन्यू बदलले; तरीही टपऱ्यांकडून नियमांना केराची टोपली

सगळं सगळं पोरकं झालंय,

यावर विश्वासच बसत नाही...

काळ माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा

आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल,

असं स्वप्नातही वाटलं नव्हतं...

आज तुमचा हा दिवस साजरा करताना

काळीज पिळवटून निघतंय,

डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत...

दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...

माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news