बावडा येथे ऊसपिकावर ड्रोनद्वारे फवारणी

बावडा येथे ऊसपिकावर ड्रोनद्वारे फवारणी

Published on

बावडा : बावडा येथे ऊसपिकावर ड्रोनद्वारे संजीवक औषधाच्या फवारणीचे प्रत्यक्षिक गुरुवारी (दि. 22) ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्तू राघू कुर्डे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ऊसपिकावर ड्रोनद्वारे फवारणी कमी वेळेत होत असून, ती इतर पद्धतीच्या फवारण्यांच्या तुलनेत प्रभावी ठरते, तसेच पिकाच्या उत्पन्नातही वाढ होते, अशी माहिती या प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे (बावडा) यांनी दिली.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील माळशिरस व इंदापूर तालुक्यात सध्या प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असल्याचे महादेव घाडगे यांनी सांगितले. या वेळी शिवाजी सावंत, दीपक कोकाटे, ज्ञानदेव घोगरे, धनाजी कोकाटे, मोहन शेटे, शिवाजी घोगरे, कृषी पर्यवेक्षक धनाजी भोसले व शेतकरी उपस्थित होते. बारामतीत पार पडलेल्या बैठकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news