पारगाव : पोल्ट्रीवर उसाच्या पाचटाचे आच्छादन

पारगाव : पोल्ट्रीवर उसाच्या पाचटाचे आच्छादन
Published on
Updated on

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : तापमानाचा पारा वाढत चालल्याने पोल्ट्री व्यावसायिक पक्षांची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री शेडवर उसाचे पाचट टाकून थंडावा निर्माण केला आहे. यामुळे पक्षांचे उष्णतेपासून संरक्षण होणार आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, निरगुडसर, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, शिंगवे आदी परिसरात पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पक्षांची विशेष काळजी घेतली जात आहे.

उष्णतेमुळे पोल्ट्रीतील पक्षी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होते. उष्णतेपासून पक्षांचा बचाव करण्यासाठी अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री शेडवर उसाच्या पाचटाचे आच्छादन टाकून थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काही पोल्ट्री शेडमध्ये पंखे बसविले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news