पुणे : साखर उत्पादन, उतार्‍यात ‘सोमेश्वर कारखाना’ अव्वल

पुणे : साखर उत्पादन, उतार्‍यात ‘सोमेश्वर कारखाना’ अव्वल

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 2022-23 च्या ऊसगाळप हंगामाची सांगता झाली आहे. 17 साखर कारखान्यांनी 1 कोटी 26 लाख 68 हजार 783 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर, सरासरी 9.99 टक्के उतार्‍यानुसार साखरेचे 1 कोटी 26 लाख 49 हजार 870 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. ऊसगाळपात बारामती अ‍ॅग्रो हा खासगी कारखाना अग्रस्थानी असून, साखर उत्पादन आणि उतार्‍यात श्री सोमेश्वर सहकारीफ अव्वलस्थानी आहे.

जिल्ह्यात 11 सहकारी आणि 6 खासगी मिळून 17 साखर कारखान्यांनी ऊसगाळप हंगाम घेतला आहे. त्यामध्ये मबारामती अ‍ॅग्रोफ या खासगी कारखान्याने 16 लाख 43 हजार 907 टन इतके सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. या कारखान्याचा साखर उतारा 8.81 टक्के राहिला असून, 14 लाख 48 हजार 950 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 12 लाख 56 हजार 769 टन ऊसगाळप केले आहे. तर 11.68 टक्के उतार्‍यानुसार सर्वाधिक 14 लाख 68 हजार 150 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. जिल्ह्यात उतारा आणि साखर उत्पादनात बाजी मारली आहे. तर दी माळेगाव सहकारी कारखान्याने 12 लाख 57 हजार 466 टन इतके ऊसगाळप करून दुसरे स्थान पटकाविले आहे. तर 10.57 टक्के उतार्‍यानुसार 13 लाख 28 हजार 900 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे.

कारखानानिहाय उसगाळप तक्ता : 

पुणे जिल्ह्यात गतवर्षाचा हंगाम 2021-22 मध्ये 1 कोटी 54 लाख 48 हजार 658 टन ऊसगाळप पूर्ण झाले होते. 2022-23 मध्ये 1 कोटी 26 लाख 68 हजार 783 टन झाले आहे. याचा अर्थ 27 लाख 79 हजार 875 टनांनी ऊसगाळप कमी झालेले आहे. गतवर्षी साखरेचे 1.64 कोटी क्विंटल इतके झालेले साखर उत्पादन यंदा घटून 1.26 कोटी क्विंटल इतकेच झालेले आहे. साखरेचे उत्पादनही 38 लाख क्विंटलने कमी झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news