Sugar Price Hike: साखरेच्या दरांना पुन्हा गोड झळाळी; घाऊक बाजारात क्विंटलमागे ४,७५० रुपयांचा टप्पा

उत्पादन घट, जुलैचा अपुरा २२ लाख टनांचा कोटा आणि कमी शिलकी साठ्याच्या शक्यतेमुळे दरवाढ कायम; अतिरिक्त कोट्याची व्यापाऱ्यांची मागणी
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

पुणे: घाऊक बाजारपेठेतमध्ये दिवसागणिक साखरेचे दर सतत वाढत आहेत. शनिवारी साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५० ते १०० रुपयांनी वाढून ४७०० ते ४७५० रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. देशात यंदा अपेक्षेपेक्षा कमी झालेले साखर उत्पादन, जुलै महिन्यासाठी घोषित केलेला २२ लाख टनाचा अपुरा कोटा आणि पुढील ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीस म्हणजे ऑक्‍टोबर २०२६ मध्ये साखरेचा शिलकी साठा ३३ लाख टनाइतका कमी राहण्याच्या शक्यतेमुळे साखरेच्या तेजीला उधाण आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Sugar
Pune ST Pandharpur Special Buses: आषाढी एकादशीसाठी पुणे विभागातून पंढरपूरला ३५० जादा एसटी बस; २१ ते २६ जुलैदरम्यान विशेष सेवा

जुलै महिन्यात साखरेचे दर क्विंटलला ६५० रुपयांहून अधिक वाढलेले आहेत. अचानकपणे पंधरवड्यात वाढलेल्या साखरेच्या दरावर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, त्यामागे साखरेचे देशांतर्गत घटलेले उत्पादन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवाय, जुलैसाठी साखरेचा विक्रीसाठी देण्यात आलेला बावीस लाख टनांचा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा आहे. साखरेच्या निविदाही क्विंटलला ४४०० रुपयांवर पोहोचल्या आहेत.

Sugar
Pune Fake Police Robbery: पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून १ कोटींच्या लुटीचा प्रयत्न; तिघांना अटक

त्यामुळे कारखान्यांकडून सध्या दिलेल्या कोट्यातील साखरेची निविदांद्वारे गरजेइतकीच साखर विक्री केली जात आहे. तर दुसरीकडे दरातील सततच्या तेजीमुळे व्यापाऱ्यांकडूनही रोजची एक ट्रकची गरज असताना दोन ट्रकइतकी साखरेची खरेदी सुरू आहे. त्यामुळे साखर दरवाढीच्या तेजीची धारणा कायम असून, एकूणच दरवाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली.

Sugar
Maharashtra Chess: बुद्धिबळात महाराष्ट्राची दमदार घोडदौड; पुण्यासह राज्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले

साखरेच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी किमान दोन लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा घोषित करण्याची मागणी सध्या होत आहे. त्यावर केंद्र सरकार साखर उपलब्धतेचा आढावा घेऊन नेमकी परिस्थिती कशी हाताळते आणि कोटा घोषित करण्यास किती अवधी घेते, त्यावर साखर दरातील तेजी-मंदीची स्थिती तूर्त अवलंबून राहील, असे सांगण्यात येत आहे.

Sugar
Pune Water Leakage: पुण्यात ३० टक्के पाणी गळतीत वाया; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

देशांतर्गत साखर उत्पादन, विक्री, निर्यात व शिलकी साठा

अपेक्षित स्थिती (साखर उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार)

  • ऑक्‍टोबर २०२५ मधील साखरेचा आरंभीचा शिल्लक साठा - ४७ लाख टन

  • यंदाच्या २०२५-२६ मधील देशांतर्गत साखर उत्पादन - २७९ लाख टन

  • घोषित १५ लाख टनांपैकी प्रत्यक्षात झालेली साखर निर्यात - ८ लाख टन

  • देशांतर्गत साखरेचा वार्षिक खप - २८५ लाख टन

  • म्हणजे आगामी ऑक्‍टोबर २०२६ च्या हंगामात शिल्लक साखर साठा - ३३ लाख टन अपेक्षित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news