बारामती: दहा गावे जोडण्याचा प्रस्ताव नामंजूर, ‘माळेगाव’ संचालक मंडळाला साखर आयुक्तांचा दणका

बारामती: दहा गावे जोडण्याचा प्रस्ताव नामंजूर, ‘माळेगाव’ संचालक मंडळाला साखर आयुक्तांचा दणका

शिवनगर, पुढारी वृत्तसेवा: माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावांचा समवेश करण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी नामंजूर केला आहे. तसे पत्र माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 30 सप्टेंबर रोजी झाली होती. यामध्ये सभेतील विषय क्र.08 नुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावांचा समावेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करावा असा होता.

बारामतीचे दोन खासदार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी दहा गावे समाविष्ट करण्याचा ठराव नामंजूर केला असून, लोकशाहीत जनमताचा कौल महत्त्वाचा असतो. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून या दोन्ही खासदारांनी सत्ताधारी संचालक मंडळाला त्याप्रमाणे सूचना द्याव्यात.
-रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक, माळेगाव साखर कारखाना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news