पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड शरद मोहोळ याचा खून दहा वर्षांपूर्वी झालेल्या वादातून तसेच वेगरे गावच्या सरपंचपदावरून झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. याच संघर्षातून शरद मोहोळला मारण्याचा कट शिजल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दि. 5 जानेवारी रोजी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून शरद मोहोळचा त्याच्या राहत्या घराजवळ खून केला होता. पुण्यातून लवासा सिटीकडे जाताना मुठा गावात शरद मोहोळचे घर, तर वेगरे हे गाव नामदेव कानगुडेचे.