देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : श्री संत तुकाराम महाराज आषाढ़ी पायी वारी सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी येणार्या वारकरी, भाविकभक्तांना कसल्याही समस्यांचा त्रास होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
पीएससी प्रणालीचा वापर
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रसंगी, कोणी हरवले, चुकले तर त्यांच्यासाठी संपूर्ण देहुगाव, वडाचा माळ, आळंदीरोड ते अनगढ़शहा बाबा दर्गा आणि सर्व मोक्याच्या ठिकाणी पीएसी सिस्टीम बसविण्यात येत आहे. त्यामुळे जर कोणी हरवले, चुकल्यास संबंधिताचे नाव ध्वनिवर्धकावर पुकारण्यात येईल. तर ते नाव सर्वच ठिकाणच्या ध्वनिवर्धकावर ऐकू येईल. परिणामी हरवलेला, चुकलेला व्यक्ती तत्काळ आपल्या आप्तेष्टांना मिळू शकण्यास मदत होणार आहे.