कमी किंमतीत घ्या स्टायलिश स्पोर्टस् बाईक

Top three Sport bike
Top three Sport bike
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जर तुम्हाला कमी किमतीमध्ये स्टायलिश स्पोर्टस् बाईक खरेदी करायची असेल तर या टॉप तीन बाईक्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या बाइकस् जरी महागड्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी यातील काही बाइक अशा आहेत ज्या चांगल्या वैशिष्ट्यांबरोबर कमी किंमत येतात. या टॉप तीन बाइकस् ची सर्व माहीत आपण येथे जाणून घेऊ शकता.

हिरो xtreme 200S

ही स्पोर्ट बाइक कंपनीची सर्वात स्वस्त स्पोर्टस् बाईक आहे. या बाईकमध्ये फुल एलईडी हेडलँप, टेललँप आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटी असलेला डिजिटल एलईडी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हीगेशन, गियर पोझिशन इंडीकेटर, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाईंडर अलर्ट देण्यात आला आहे. या बाईकमध्ये 200 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 8 हजार आरपीएमवर 18 बीएचपी ताकद आणि 6500 आरपीएमवर 17.1 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने युक्त आहे. याची किंमत 1 लाख 28 हजार रुपये आहे.

बजाज पल्सर एनएस 200

कंपनीने ही बाईक नव्या फिचर्ससोबत लॉन्च केली आहे. नव्या बजाज पल्सर एनएस 200 मध्ये युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम)चं फिचर उपलब्ध करुन दिलं आहे. पल्सर एनएस 200 मध्ये 200 CC चं लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. तर, यातील अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम गाडीची चाक लॉक होण्यापासून रोखतं. तसेच एबीएस फिचर बाईक स्लिप होण्यापासूनही रोखतं. या सिस्टममुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत 1 लाख 34 हजार रुपये आहे.

टीवीएस अपाचे आरटीआर 200 4V

ही स्पोर्ट बाइक कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी बाइक आहे. ती कंपनीने दोन प्रकारात लॉन्च केली आहे. या सेगमेंट मध्ये ही एकमेव अशी बाइक आहे. ज्यात मल्टिपल रायडिंग मोड्स सोबत अॅडजस्टेबल सस्पेंशन मिळते. या बाइकमध्ये सेगमेंट फर्स्ट रायडिंग मोड्स फीचर मिळते. वेगवेगळ्या रस्त्यांसाठी जबरदस्त रायडिंग अनुभवसाठी स्पोर्ट, अर्बन आणि रेन सारखे तीन रायडिंग मोड्स मिळतात. याशिवाय, अॅडजस्टेबल फ्रंट सस्पेंशनसोबत प्री लोड अॅडजस्टमेंट आणि प्रीमियम शो सस्पेंशन मिळते. ब्रेकिंग फीचर्स सोबत याच्या फ्रंट मध्ये २७० मिलिमीटर आणि रियर मध्ये २४० मिलिमीटरचे पीटल डिस्क ब्रेक मिळत आहे. यात १९८ सीसी, सिंगल सिलिंडर, ४ वॉल्व, ऑइल कूल्ड इंजिन दिले आहेत. याचे इंजिन ८५०० आरपीएमवर २०.५४ बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि ७००० आरपीएमवर १८.१ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड गियरबॉक्स दिले आहेत. या मोडमध्ये १०५ किलोमीटर प्रति तास टॉपची स्पीड मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news