रासे ग्रामसभेत कचराडेपोला तीव्र विरोध

रासे ग्रामसभेत कचराडेपोला तीव्र विरोध
Published on
Updated on

शेलपिंपळगाव; पुढारी वृत्तसेवा : रासे येथे झालेल्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेत गावच्या हद्दीत असलेल्या गायरान जमिनीवरील चाकण नगरपरिषदेच्या प्रस्तावित कचराडेपोला मोठ्या संख्येने निषेध आणि विरोध दर्शविला. सध्या चाकण नगरपरिषद त्यांच्या हद्दीतील घनकचरा टाकण्यासाठी जागा शोधत आहे. त्याबाबत त्यांनी रासे गावच्या हद्दीतील गायरान जमिनीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यानुसार पीएमआरडीएने त्यांना परवानगी दिली आहे. रासे गावच्या ग्रामसभेची मान्यता त्यांना त्याबाबत हवी आहे.

तशी विचारणा रासे ग्रामपंचायतीला प्रशासनाकडून होऊन ग्रामसभेत तसा ठराव मांडण्यात आला. प्रस्तावित जागेशेजारी रासे गावचा पाझर तलाव आणि आदिवासी बांधवांची लोकवस्ती आहे. त्यामुळे रासे येथे घनकचरा डेपो उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. गावाला पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रशासनाकडून याबाबत दखल घेतली जात नाही आणि कचराडेपोसाठी जागेची पाहणी चालू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

रासे गावाला शेतीस पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी व ओढे हे ज्या तलावावर अवलंबून आहेत, त्या तलावाजवळच हा प्रस्तावित कचराडेपो करण्याचा प्रशासनाचा घाट आहे. त्यास आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. भावी पिढ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. गरज भासली तर उपोषणाला बसण्याची तयारी गावच्या तरुणांपासून वयोवृद्ध स्त्री-पुरुषांची आहे.

                                                       – लक्ष्मण शिंदे, उपसरपंच, रासे

चाकण नगरपरिषदेच्या प्रस्तावित गायरानावरील घनकचरा डेपोसाठी वेळोवेळी विरोध केला आहे आणि आताही केला जाईल. त्याबाबतचा पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय कार्यालयांना नकार कळविला जाईल. आपण इतकेच करून थांबणार नाही तर चाकण नगरपरिषदेपुढे घंटानाद आंदोलन करणार आहोत.

                                               – विजय शिंदे, माजी आदर्श सरपंच, रासे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news