चाकण पंचक्रोशीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

चाकण पंचक्रोशीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढतच आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी होत आहेत. चाकणजवळील पठारवाडी भागात मागील काही दिवसांत शेतकर्‍यांच्या तीन लहान वासरांचा हिंस्र भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

खेड तालुक्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 200 पेक्षा अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या प्रशासनाकडे नोंदी आहेत. चाकणजवळील मेदनकरवाडीमध्ये मागील पंधरवड्यात एकाच दिवसात 10 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. चाकणजवळील एका वाडीत छिन्नविच्छिन्नावस्थेत सापडलेल्या चिमुरडीला भटक्या कुत्र्यांनीच ठार केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

चाकण भागात शेकडो भटकी कुत्री असून, ही संख्या वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चाकणलगतच्या शेतवस्त्यांवर लहान वासरांना भटक्या कुत्र्यांनी ठार केल्याच्या घटना घडल्याचे पशुपालक राहुल वाडेकर यांनी सांगितले. दुर्दैवाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कुठेलीही यंत्रणा या संपूर्ण भागात उपलब्ध नाही. प्रशासनाने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news