

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वस्त धान्य दुकानांमधून आनंदाचा शिधा दिला जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. मात्र, आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत केवळ 13 टक्के, तर उर्वरित ग्रामीण भागात 65 टक्के शिधा संचाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे डॉ.आंबेडकर जयंतीपर्यंत शिधावाटपात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना 100 रुपयांत एक लिटर तेल, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर मिळणार आहे.
'आनंदाचा शिधा' वाटपाचे ग्रामीण भागात पाच लाख 61 हजार 93 लाभार्थी असून, मार्च महिन्यात एक लाख 83 हजार 219, तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत एक लाख 82 हजार 534 अशा एकूण तीन लाख 65 हजार 753 शिधा पत्रिकाधारकांना शिधावाटप करण्यात आला आहे.
– सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी.