हडपसर-यवत उन्नत मार्गास राज्य सरकारची मंजुरी; आ. कुल यांच्या पाठपुराव्याचे यश

दौंडमधील यवतपर्यंतचा उन्नत मार्ग
Rahul Kool
हडपसर-यवत उन्नत मार्गास राज्य सरकारची मंजुरी; आ. कुल यांच्या पाठपुराव्याचे यशPudhari
Published on
Updated on

यवत: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील हडपसर ते यवत सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) प्रकल्पासाठी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले आहे. राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा 5262.36 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील हडपसर ते यवतदरम्यान वाहतूक कोंडी, नागरिकांचा त्रास आणि रस्तारुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) उभारणी व रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे 5262.36 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे. (Latest Pune News)

Rahul Kool
Political News: बेनकेंनी शरद पवारांची साथ सोडल्याने पराभव; माजी सरपंच रोहिदास वेठेकर यांची टीका

या प्रकल्पासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या प्रकल्पाची सखोल दखल घेतली आणि सविस्तर डीपीआर तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या, ज्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी आज शक्य झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊन अपघात कमी होतील आणि स्थानिक विकासाला मोठा चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rahul Kool
Shirur Crime News: तलाठ्याचा मृतदेह आढळला त्यांच्याच विहिरीत; करडे येथील दुर्दैवी घटना

हडपसर ते यवत या महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली. आज या प्रयत्नांना यश मिळाले असून, या प्रकल्पामुळे पूर्व पुणे, हवेली व दौंड तालुक्यांतील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकास होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार.

- राहुल कुल, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news