

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
महामेट्रोच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशनचे काम वेगात पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
पुणे मेट्रोच्या संत तुकारामनगर स्टेशनचा पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांसाठी सुरू झालेला हा पहिलाच पूल आहे.
पिंपरी ते दापोडी या 7.50 किलोमीटर अंतराची मार्गिका तयार झाली आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन तयार झाले आहे. फुगेवाडी स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे.
तर, उर्वरित पिंपरी महापालिका भवन, नाशिक फाटा, कासारवाडी, दापोडी या स्टेशनची कामे वेगात पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.संत तुकारामनगर स्टेशनवरील पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
त्याचा वापर नागरिक करीत आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस ये-जा करण्यासाठी तसेच, वल्लभनगर एसटी आगारात जाण्यासाठी या पुलाचा नागरिक वापर करीत आहेत. हा पूल सर्व नागरिकांना वापरता येणार आहे.
मेट्रोने प्रवास करण्यासाठी दुसर्या मजल्यावरील पुलावर म्हणजे प्लॅटफॉर्मवर जावे लागते. महापालिकेने उभारलेला लोखंडी पूल महामेट्रोने हटविला आहे. त्याचे सांगाडे रस्त्याच्या दुभाजकावर ठेवण्यात आले आहेत.