आशिष देशमुख पुढारी प्रतिनिधी :
यंदा महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान झाला असून, राज्यात १ जून ते २ सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्ऱ्यातील एकूण ३६ पैकी २५ जिल्ह्यांत मुसळधार, ९ जिल्ह्यांत साधारण, तर अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. २०१९ नंतर पाच वर्षातील हा सर्वांत चांगला मान्सून राज्यात बरसला आहे.
(Monsoon Update)
विशेष म्हणजे मराठवाड्याची सरासरी दोन दिवसांच्या पावसाने १६ वरून चक्क ३१ टक्क्यांवर गेली, इतका पाऊस ४८ तासांत या भागात झाला. मागच्या वर्षी अल निनोच्या स्थितीमुळे राज्य सरासरीत काठाबार पास झाले होते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या वकेवळ ७ टक्के जास्त पाऊस झाला होता.
यंदा ऑगस्ट अखेर राज्यात सरासरीच्या २८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. अजून सप्टेंबर महिन्याचा पाऊस पात वाढणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दोनच दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात हाहाकार निर्माण झाला आहे. या दोन्ही भागांची पावसाची सरासरी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत कमी होती. सप्टेंबरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने सर्वच विभागांत सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाची नोंद होईल, असा अंदाज आहे.
मुसळधारेचे जिल्हे
(२१) गडचिरोली (२४), वर्धा (२४), बीड (५१), धाराशिव (४५), लातूर (४२), धुळे (४४), जळगाव (४५), कोल्हापूर (४४), नंदुरबार (२८), नाशिक (४८), पुणे (५७), सातारा (२३), मुंबई (२०), मुंबई उपनगर (२३), पालघर (२३), रायगड (२१), रत्नागिरी (२५), सिंधुदुर्ग (४).
साधारण पाऊस (जिल्हे : १३)
मुंबई (१४), ठाणे (८), छ. संभाजीनगर (१३), जालना (१०), नांदेड (२१) अकोला (१०), अमरावती (४), भंडारा (४), बुलडाणा (१९), चंद्रपूर (१९), गोंदिया (८), नागपूर (८), वाशिम (१२)
सप्टेंबरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज
मान्सून परतीचा प्रवासही लांबण्याची शक्यता
फक्त हिंगोलीत अतिवृष्टी होऊनही अजून ४८ टक्के पावसाची तूट
तीन महिन्यांत २८ टक्के जास्त पाऊस
४८ तासांत मराठवाड्याची सरासरी
१६ वरून ३१ टक्क्यांवर ३६ पैकी २१ जिल्ह्यांत मुसळधार
१३ जिल्ह्यांत साधारण २ जिल्ह्यांत अतिवृष्टी
गणपती उत्सवात राज्यात धो धो पावसाचा अंदाज
मराठवाड्यात ४८ तासांत चित्र बदलले मराठवाडयात मान्सूनने अक्षरशः जादूच केली. तीन महिन्यांची सरासरी अवघ्या ४८ तासांच्या पावसाने बदलून टाकली. ३१ ऑगस्ट अखेर मराठवाड्याची तीन महिन्यांची सरारी १६ टक्के होती, ती २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ३१ टक्के झाली. म्हणजे तीन महिन्यांत जो पाऊस पडला, तेवढा पाऊस अवघ्या ४८ तासांत झाला.
त्याच्या वाऱ्याची दिशा अचानक बदलली. त्याचा केंद्रबिंदू विदर्भ होता. त्यामुळे त्या भागासह मराठवाड्यात अतिवृष्टी सुरू आहे. मंगळवारपासून त्या भागातला पाऊस कमी होत होईल आणि इतर भागांत सुरू राहील. पुन्हा ५ ऑगस्टपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे गणपती उत्सवात पाऊस बाढणार आहे.
डॉ. अनुपम कश्यपी, निवत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे.
मराठवाडा आणि विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र तयार त्या भागात पाऊस चांगला होत आहे. आत्ता ३ ते ५ ऑगस्टपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महार- 66 झाल्यामुळे सध्या त ाष्ट्रात पाऊस राहणार आहे. मात्र, मराठवाडधात एकदम कमी होत आहे. विदर्भाताही कमी जोर राहील, पण बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे गणशोत्सवात पुन्हा मुसळधारेचा अंदाज आहे.
डॉ. एस. डी. सानप, हवामान शाखंड, आयएमडी, पुणे.
मराठवाडा आणि विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र तयार त्या भागात पाऊस चांगला होत आहे. आत्ता ३ ते ५ ऑगस्टपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महार- 66 झाल्यामुळे सध्या त ाष्ट्रात पाऊस राहणार आहे. मात्र, मराठवाडधात एकदम कमी होत आहे. विदर्भाताही कमी जोर राहील, पण बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे गणशोत्सवात पुन्हा मुसळधारेचा अंदाज आहे.
डॉ. एस. डी. सानप, हवामान शाखंड, आयएमडी, पुणे.