

बावडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून सध्या बदललेल्या हवामानामुळे आकाशामध्ये विशेषत: सूर्योदयाच्या व मावळतीच्या वेळी नेत्रदीपक सौंदर्य पाहावयास मिळत आहे. ढगांमध्ये सध्या पावसाचे कण असल्याने सूर्यप्रकाशाची किरणे ढगांवर पडल्याने रंगछटा निर्माण होत आहे.
बावडा येथे बुधवारी सूर्योदयाच्या वेळी आकाशात पिवळेधमक सौंदर्य निर्माण झाले होते, असे बावडा येथील नागरिक विकास पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी सध्या आकाशात निर्माण होत असलेल्या सौंदर्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.